शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेची पातळी खालावल्याने जॅकवेल उघडे...

By admin | Updated: November 19, 2015 00:41 IST

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न : धरणातून पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

कोपर्डे हवेली : कृष्णा नदीची पाणीपातळी खालावल्याने नदीकाठच्या गावातील नळपाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडले आहे. परिणामी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना दुसरीकडून पिण्याचे पाणी आणून वापरावे लागत आहे. जॅकवेल उघडे पडल्याने नदी पात्रात धरणातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांतून होत आहे. यावर्षीचा पाऊस बऱ्याच अंशी कमी प्रमाणात पडल्याने विहिरींसह ओढे, नाले व नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. कृष्णा नदीच्या पात्रातून अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तर काही लहान गावांमध्ये नदीकाठावर बोअर मारून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने गावच्या पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडले आहेत. कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीने ज्याठिकाणी पाण्याचा साठा आहे. त्याठिकाणाहून सुमारे ४०० फुटांवरून पाणी टाकीत सोडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत गावची यात्रा असल्याने पाण्याची समस्या भेडसावण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तासवडे, शिरवडे, नडशी, वहागाव, घोणशी गावांतील पाण्याची पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. प्रशासन व संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. (प्रतिनिधी) साथीच्या आजारांचेही संकट... नदीपात्रात पाणी पातळीत कमालीची घट झाली असून, उपलब्ध पाणी अशुध्द असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.  

दिवसेंदिवस नदीच्या पाणीपातळीत घट होत असल्याने ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करत आहे. यात्रेसाठी वेळ पडल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. - नेताजी चव्हाण, उपसरपंच, कोपर्डे हवेली.  

नळपाणीपुरवठा योजनेबरोबरच पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यासाठी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात व नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी. - निवास थोरात, उपसरपंच, नडशी  

पाणी उपसाविना पडून असलेले जॅकवेल... कृष्णा नदी नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावली असल्याने पाणी उपसा करणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे जॅकवेल उघडे पडले आहे.