शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

आषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:44 IST

आषाढीनिमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली जीप गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर जाऊन आदळली. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वडूजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ठिकाणी बुधवारी रात्रीही ट्रॅक्टर घरावर आदळला होता.

ठळक मुद्देआषाढीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या जीपला अपघात, सात जखमीकुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर आदळली गाडी

म्हसवड/कुकुडवाड : आषाढीनिमित्ताने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेली जीप गुरुवारी सकाळी म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड घाटाच्या उताराला घरावर जाऊन आदळली. यामध्ये सातजण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वडूजमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या ठिकाणी बुधवारी रात्रीही ट्रॅक्टर घरावर आदळला होता.या अपघातात रमेश लक्ष्मण कळंत्रे (वय ४२) यांचे डोके, सुगंधा रघुनाथ मोरे (४२) यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. रमेश विष्णू मोरे (४२), अरुण लक्ष्मण मोरे (४०), सीता बाबासो मोरे (४०), सर्जेराव तातोबा चोरगे (५०), संतोष कृष्णा मोरे (२५, सर्व रा. शेंडेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना मायणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉ. गणेश मदने यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वडूज येथे पाठवले आहे.म्हसवड-मायणी रस्त्यावरील कुकुडवाड खिंडीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, संरक्षण कठड्याची पडझड, तर साईडपट्ट्या खचल्याने वारंवार अपघात होत आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे.मायणीवरून म्हसवडकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर बुधवारी रात्री कुकुडवाड घाटातून येत असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उसाने भरलेल्या दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर सुवर्णा बाळासाहेब जाधव यांच्या घरावर आदळला.या अपघाताच्या ठिकाणापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर दुसºयाच दिवशी गुरुवारी सकाळी कुंभारगाववरून पंढरपूरला निघालेली जीप कुकुडवाड खिंडीत येताच भुजंग महादेव जाधव यांच्या घरावर जाऊन आदळली. यामध्ये घराच्या भिंतीचे नुकसान झाले. जीपमधील चारजण जखमी झाले. जखमींना मायणी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.कुकुडवाड घाटातील रस्ता बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्त करून संरक्षण कठडे, साईडपट्ट्या, खड्डे तातडीने दुरुस्ती करावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी आंदोलन करणार आहे, असा इशारा कुकुडवाड माजी सरपंच संजय जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर