खांबावरून पडलेल्या जनमित्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:26+5:302021-04-02T04:40:26+5:30

कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा ...

Janmitra dies after falling from a pole | खांबावरून पडलेल्या जनमित्राचा मृत्यू

खांबावरून पडलेल्या जनमित्राचा मृत्यू

कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या जनमित्राचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे मृत्यू झालेल्या जनमित्राचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील सबस्टेशन अंतर्गत असलेल्या आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाइनला सोमवारी सकाळी बिघाड झाला होता. हा बिघाड दुरुस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि लाइनमन हे तिघे जण आणे येथे गेले होते. त्या वेळी कोळेवाडी येथून आलेला विद्युत पुरवठा रोहित्र (ट्रान्सफार्म) बंद करून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरुस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र तांबवे येथील सबस्टेशनवरून या लाइनला वीजपुरवठा सुरू होता. उच्च दाबाची वाहिनी असल्याने काही सेकंदांत विजेचा जबर धक्का लागून जनमित्र खांबावरून खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. या वेळी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास चचेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. इंद्रजित यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते, चुलती, चुलत भाऊ, बहीण असा परिवार आहे.

चौकट :

ठेकेदारी अंतर्गत इंद्रजित जनमित्र म्हणून कोळेवाडी येथील सबस्टेशनला काम करत होता. काम करत असताना ओढवलेल्या अपघातामुळे त्याचा मृत्यू झाला. परिणामी, संबंधित ठेकेदाराकडून उतरविण्यात आलेला १० लाखांचा विमा आणि १० ते १२ हजार रुपयांपर्यंत पेन्शन इंद्रजित यांच्या वारसाला मिळणार आहे.

Web Title: Janmitra dies after falling from a pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.