शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पक्षी वाचवासाठी पंधरा गावांत जागर, वन विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:16 IST

forestdepartment, wildlife, birds, sataranews निसर्गाच्या साखळीत प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वन विभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत. पक्षी सप्ताहानिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक घेत १५ गावांत पक्षी वाचवा निसर्ग वाचवाचा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देपक्षी वाचवासाठी पंधरा गावांत जागर, वन विभागाचा उपक्रम पक्षी सप्ताहानिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक; निसर्ग वाचवाचा संदेश

मलकापूर : निसर्गाच्या साखळीत प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वन विभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले गेले आहेत. पक्षी सप्ताहानिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक घेत १५ गावांत पक्षी वाचवा निसर्ग वाचवाचा संदेश देण्यात आला.सध्या वाढणारी सिमेंटची जंगले, वृक्षतोड व पर्यावरणातील बदलामुळे अनेक पक्षी नामशेष होत आहेत. पक्ष्यांविषयी समाजामध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने पक्षीमित्र पक्षी सप्ताह साजरा करावा म्हणून अग्रेसर होते. त्यांच्या मागणीला शासनाने संमती देऊन ५ नोव्हेंबर मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबरला डॉ. सलीम अली यांची जयंती, हे औचित्य साधून हा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. या सप्ताहानिमित्त येथील वनविभागाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

आसपासच्या पंधरा गावांत पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवली आहे. पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये, एक पक्षी की जान बचाएं, पक्षी है खेतों की शान, जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाव जीवन बचाव, असे अनेक संदेश देणारे फलक गावोगावी लावले आहेत.

आगाशिव डोंगरावर जखिणवाडी वनक्षेत्रात साताऱ्याचे सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, कऱ्हाडचे वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे, सर्व वनरक्षक, वनपाल, ग्रामस्थ व पर्यटक यांच्या उपस्थितीत वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पक्ष्यांची नावे, ओळख, राहणीमान याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.विविध पक्ष्यांचे निरीक्षणपक्षी सप्ताहाअंतर्गत गावोगावी विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. घार, मोर लांडोर, बुलबुल, खंड्या, पोपट, सुतारपक्षी, चिमणी, पारवा आदी पक्ष्यांचे निरीक्षण केले. जमिनीवर आढळणारे, झाडावर राहणारे तसेच पाण्यावरती परिसंस्थेवर अवलंबून असणारे पक्षी हे संपूर्ण पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि निसर्गातील जैवविविधता संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त असतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर