शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्ती लावतेय लळा, तिथेच धोका ओळख बाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:45 IST

हाय आणि छान दिसतेस यापासून सुरू हाेणाऱ्या संवादातून पुढे भलताच गुंता

सातारा : कुटुंबातील बंधने, पालकांचा ओरडा आणि चांगल्या वागण्याचा ताण असह्य झालेली तरुणाई आता अनेकांच्या टार्गेटवर येऊ लागली आहे. सोशल मीडियाच्या विविध ॲप्सच्या माध्यमातून मेसेंजरमध्ये डोकावणे आता सहज शक्य होऊ लागले आहे. महिलांच्या हाय आणि छान दिसतेस यापासून सुरू हाेणारा संवाद पुढे भावनिक पातळीवर जातो. यातून गाठीभेटी, जवळीकता, खर्च केल्यामुळे आलेली उपकाराची भावना असा भलताच गुंता होऊन बसतो. हे नाते राखणं आणि सोडणं तरुणींना जमत नसल्याने त्या अलगद सेक्स रॅकेटमध्ये अडकत चालल्या आहेत. त्यामुळे अनोळखी कोणीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथेच धोका असे समजणे गरजेचे आहे.सातारा पोलिसांच्या वतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने रील स्टार असलेल्या ३२ वर्षीय तरुणीने तीन तरुणांच्या मदतीने वेश्या व्यवसाय सुरू केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. एका ध्वनीफितीच्या आधारावर उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे सोशल मीडियाचे विश्व आणि त्यात रूतत जाणारी तरुणाई हे भीषण वास्तव्य समोर आले आहे. समाज माध्यमांवर अनोळखी मैत्री, त्यातून गाठीभेटी, मुलींसाठी खर्च करून त्यांना ऋणात ठेवून त्यांना वेश्या व्यवसायाच्या सापळ्यात अडकविण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा समाज माध्यमांवरील मैत्री चर्चेत आली.समाजमाध्यमांवर अनोळखी मैत्री टाळामोबाइलमुळे अवघे जग एका क्लिकवर आले आणि कुटुंबीय परस्परांशी दुरावले. परिणामी बाहेरचे जग आपलेसे करण्यासाठी तरुणाई सोशल मीडियावर अड्डा जमवू लागली. अनोळख्या व्यक्तींच्या भावनिक मेसेजला प्रतिसाद देऊ नये. कारण बहुतांश वेळेला अनोळखी व्यक्ती विशिष्ट उद्देश ठेवून बुद्धीने मेसेज करत असतो तर तरुणाई मनाने उत्तर देत असते. मन आणि मेंदूचे हे द्वंद्व मुलींना आयुष्यभरासाठी धडा शिकवून जाते.संगत तपासून पाहामहाविद्यालय आणि क्लास या दोन्हीशिवाय अन्यत्र कुठेही जायचं असेल तर कुटुंबात मित्र-मैत्रीण सोबत आहेत हे सांगितले जाते. घरातून बाहेर पडताना दाेन आणि बाहेर गेल्यावर चार अशी परिस्थिती प्रत्यक्ष असण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘संशयी पालक’ म्हणून शिक्का बसला तरी चालेल पण मुलांची संगत तपासणे महत्त्वाचे ठरते.

या कारणांनी अडकतात जाळ्याततरुण वयात कुटुंबातून ज्या गोष्टींना विरोध केला जातो ते सगळं मुला-मुलींना हवंहवंसं वाटते. हाॅटेलिंग, लाँग ड्राइव्ह, आऊटींग, सरप्राइज पार्टी, मोबाइल रिचार्ज, महागडे गिफ्ट अशी ही मोठी यादी आहे. याच आधारावर मुलींना जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे रोजरोज पार्टी देणारी मैत्रीण असली तरीही तिच्या पालकांशी संवाद साधणे महत्त्वाचे ठरते.

यशाचं सादरीकरण म्हणून ऐपत नसतानाही पालक मुला-मुलींना महागडे मोबाइल भेट देतात. जगाशी स्पर्धा करण्यासाठी या गॅझेटची मुलांना जशी गरज आहे, त्याच पद्धतीने पालकांनीही याचा स्मार्ट वापर शिकून घ्यावा. ‘आम्हाला यातले काही समजत नाही असे म्हणण्यापेक्षा मुलांना याचे ज्ञान पालकांनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.- वैदेही बगाडे, पालक 

सोशल मीडियाच्या अति वापरामुळे महाविद्यालयीन मुला-मुलींची मोठी फसगत होत आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळण्यापासून स्वत:चे खासगी फोटो कोणालाही शेअर न करण्याचे बंधन तरुणाईने पाळणे गरजेचे आहे. व्हिडीओ काॅल आणि डेटिंग ॲप सध्या नवी डोकेदुखी ठरू पहात आहे. - जय गायकवाड, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSocial Mediaसोशल मीडियाMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी