शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची सिंचन मागणी कमी; कोयना धरणातील विसर्ग घटला

By नितीन काळेल | Updated: May 20, 2024 18:35 IST

धरणातील पाणीसाठा..जाणून घ्या: १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष 

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. १ जूनपासून नवीन तांत्रिक वर्ष सुरू होणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी अुपरे पर्जन्यमान झाल्याने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपासूनच कोयनेसह उरमोडी, कण्हेर आदी धरणांतून सतत पाण्याची मागणी होत होती. तर कोयनेतून सांगली जिल्ह्यासाठी मागील पाच महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. पण सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी कमी झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ पासून सांगलीसाठी विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाच्या विमोचक द्वारामधून १ हजार क्युसेक विसर्ग केला जात होता. तो ५०० क्युसेकने कमी झाला आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा वीज गृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यामधून २१०० आणि विमोचक द्वार ५००, असे २६०० क्युसेक पाणी सांगलीसाठी सोडले जात आहे. हे सर्व पाणी कोयना नदीतून सांगलीसाठी जात आहे. तर धरणातील पाणी तरतुदीचे तांत्रिक वर्ष ३१ मे रोजी संपत आहे. १ जूनपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. सध्या धरणात २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण २४.५२ इतके आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीDamधरणWaterपाणी