शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
10
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
11
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
13
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
14
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
15
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
16
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
17
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
18
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
19
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
20
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार

आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका बसणार आहे.

ठळक मुद्देआनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणारलहान वाहनांना पाच तर मोठ्या वाहनांना पंधरा रुपयांची वाढ

सायगाव : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका बसणार आहे.साताऱ्यापासून अवघ्या शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पुण्याशी सातारकरांची नेहमीच जवळीक राहिली आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, आयटी तसेच इतर क्षेत्रात साताऱ्यातील शेकडो तरुण पुण्यामध्ये स्थायिक झाले आहेत. त्यातील बहुतांश तरुण शनिवार, रविवारी गावी साताऱ्यात येत असतात. काहीजण एसटीने तर बहुतेकजण तीन-चार जणांमध्ये एखादे खासगी वाहन करून येतात. त्या सर्वांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, तर अर्धवट पुलांची कामे अशा असुविधा असतानाही टोलशुल्कात सातत्याने वाढ केली जात आहे.

सेवा रस्ते सुस्थित नसल्यामुळे स्थानिक वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो. असे असतानाही महामार्गाचे काम पूर्ण न करता केवळ टोल दरवाढ करून वाहनधारकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे.                                                       आनेवाडी                      खेड शिवापूरवाहनांचे प्रकार                           जुने      नवीन                     जुने        नवीनकार, जीप, व्हॅन                          ६५           ७०                       ९५              १००हलकी                                       १०५          ११०                     १५०           १५५बस, ट्रक                                    २२०         २३५                     ३१५           ३३०अवजड                                      ३४५         ३६०                     ४९५           ५१०मोठ्या आकारातील                   ४१५          ४३०                    ६००           ६१५ 

टोलनाक्यावरील दरवाढ करण्यास काहीही हरकत नाही; पण त्यासाठी सर्वप्रथम आवश्यक त्या सुविधा, चकाचक रस्ते पुरवावेत. घरगुती कारणांसाठी पुण्याला ये-जा करणाऱ्यांना या दरवाढीमुळे त्रासच सहन करावा लागणार आहे.- हणमंत शिंदे,सातारा

टॅग्स :tollplazaटोलनाकाSatara areaसातारा परिसर