शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पहिल्या महायुद्धात कऱ्हाडमधील सैनिकांचा सहभाग, महत्वाचे दस्तावेज सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:39 IST

सैनिकांचा महायुद्धातील समावेश व त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आता शक्य झाले

कऱ्हाड : कऱ्हाडसह परिसराला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात या परिसरातील तीनशेपेक्षा अधिक सैनिक सहभागी असल्याचे दस्तावेज नुकतेच सापडले आहेत. त्यामुळे या सैनिकांचा महायुद्धातील समावेश व त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणे आता शक्य झाले असल्याची माहिती मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी दिली.येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन व मिरज इतिहास संशोधन मंडळाशी सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड होते. कर्नल जे. पी. सत्तिगिरी, कर्नल दिनेश कुमार झा, प्रा. डॉ. सदाशिव पाटील व प्रा. सचिन बोलाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कर्नल जे. पी. सत्तिगिरी म्हणाले, इतिहासातून शिकण्याचा प्रयत्न करा. इतिहासातील आदर्श प्रतिमांचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळेल. मात्र, इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासातील चुका विसरू नका. कारण त्या विसरला तर परत त्याच चुका होण्याची शक्यता असते. त्याबाबतीत सतर्क राहा.प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांचे यावेळी भाषण झाले. प्रा. ए. बी. कणसे, ॲड. राम होगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रा. सचिन बोलाईकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. शोभा लोहार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रांत सुपुगडे यांनी आभार मानले. प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा. युवराज कापसे, नारायण नाईक यांनी परिश्रम घेतले.           शस्त्रास्त्रांनी दिली शौर्याची साक्षप्रदर्शनात आद्यपुराश्मयुग, मोहेंजोदारो, हडप्पा, रावी, मध्यपुराश्मयुग तसेच सिंधू संस्कृतीचे पोस्टरच्या माध्यमातून तपशीलवार विवेचन दिसून आले. याशिवाय इतिहासकालीन दिनदर्शिका, शिवकालीन नाणी, जुनी चलने, शिवरायांची राजचिन्हे, मोडीतील विविध पत्रे तसेच मराठा कालीन विविध तलवारी, दुधार, युद्धफरशी, युद्धपट्टा, कट्यार, भाला, शिंगीभाला, जांबीया, फरशी आदी शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात शौर्याची साक्ष देत होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर