शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक; शिरवळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 16:24 IST

३६ तास तपास​​​​​​​

मुराद पटेल

शिरवळ : शिरवळ येथील घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या. संबंधितांकडून १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील पंढरपूर फाटा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद शिरवळ पोलिस ठाण्यात २९ डिसेंबरला दाखल झाली होती. त्यानुसार पोलिस पथक तपास करीत होते. शिरवळ याठिकाणी वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार रामा दादा मंडलिक (वय २०, मूळ रा. जामखेड जि. अहमदनगर) याच्यासह आणखी दोघांचा समावेश असल्याचे शिरवळ पोलिसांना गोपनीय माहिती व तांत्रिक मुद्यांच्या आधारावर निष्पन्न झाले. दरम्यान, पिंपरी चिंचवड येथील अक्षय दशरथ शिंदे (22, रा. पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड) याला पिंपरी चिंचवड क्राइम युनिट 2 च्या सहकार्याने ताब्यात घेतले. यात वैभव दादाराव बनसोडे (२८, मूळ रा. तेलगाव सिना, जि. सोलापूर, सध्या रा. शिरवळ) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वैभव बनसोडे याला ताब्यात घेत त्याच्याजवळील १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत  केला. त्यानुसार रामा मंडलिक, अक्षय शिंदे, वैभव बनसोडे यांना अटक केली.संबंधितांची पोलिस कोठडी संपल्यानंतर खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत.

३६ तास तपासघरफोडी टोळीचा पर्दाफाश करताना शिरवळ पोलिसांनी अथक परिश्रम करीत सलग ३६ तास तपास करीत पुणे, पिंपरी-चिंचवड ते सोलापूर जिल्हा अशी मोहीम राबवीत चोरट्यांना अटक केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस