‘त्या’ जखमी वृद्धेचा आठ दिवसांनी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:34+5:302021-09-11T04:41:34+5:30
महाबळेश्वर : येथील प्राथमिक शाळेमागील चाळीत १ सप्टेंबर रोजी पती राजेंद्र जाधव याने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून ...

‘त्या’ जखमी वृद्धेचा आठ दिवसांनी मृत्यू
महाबळेश्वर : येथील प्राथमिक शाळेमागील चाळीत १ सप्टेंबर रोजी पती राजेंद्र जाधव याने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या दुर्दैवी घटनेत भाजून जखमी झालेल्या बायना जाधव यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु घटनेच्या आठ दिवसांनी या महिलेचा मृत्यू झाला. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेमागील चाळीत शाळा क्र. १ च्या इमारतीमागील चाळीत राजेंद्र जाधव (वय ५५) हा घोडे व्यावसायिक राहात होता. त्याने १ सप्टेंबर रोजी सकाळी पत्नी शौचालयावरून परत घरी येत असताना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. पत्नीला जळत्या अवस्थेत टाकून घटनास्थळावरून पळून गेला होता. चाळीतील रहिवाशांनी प्रसंगावधान राखून त्या महिलेल्या वाचविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सातारा व नंतर मुंबई येथे त्या महिलेला हलविण्यात आले. मुंबई येथे गेली आठ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. शेवटी मृत्यूने त्यांना गाठले व ८ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील पती राजेंद्र जाधव हा अद्याप महाबळेश्वर पोलिसांच्या हाती लागला नाही. प्रारंभी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके वेगेवगळ्या ठिकाणी रवाना झाली. मात्र एका दिवसात तपास करून पोलीस रिकाम्या हाताने परतले.