रहिमतपुरात जखमी वानराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 17:36 IST2020-11-09T17:34:32+5:302020-11-09T17:36:12+5:30
forestdepartment, satara, monkey कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका जखमी वानराचा मृत्यू झाला. याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावरून खाली पडल्यामुळे सुमारे दीड वर्ष वयाच्या जखमी वानराचा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. काही वानर या जखमी पिलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते.

रहिमतपुरात जखमी वानराचा मृत्यू
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका जखमी वानराचा मृत्यू झाला. याबाबत वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडावरून खाली पडल्यामुळे सुमारे दीड वर्ष वयाच्या जखमी वानराचा सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. काही वानर या जखमी पिलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते.
अखेर वनविभागाने जखमी वानराला पशुवैद्यकीय अधिकारी उमेश मस्के यांच्याकडे नेले; परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यापूर्वीच वानराचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी मस्के यांनी सांगितले.
दरम्यान वानराचा तीन-चार दिवसांपूर्वी उजवा हात मोडला असल्याची शक्यताही वर्तवली. यानंतर मृत्यू झालेल्या वानराचा पवारवाडी येथील वनहद्दीत वनविभागाच्यावतीने दफनविधी करण्यात आला.