इन्फोसिसच्या नफ्यात ९.८% वाढ

By Admin | Updated: October 12, 2015 22:17 IST2015-10-12T22:17:48+5:302015-10-12T22:17:48+5:30

देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या नफ्यात ९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ३३९८ कोटी रुपये इतका झाला आहे.

Infosys's profit increased by 9.8% | इन्फोसिसच्या नफ्यात ९.८% वाढ

इन्फोसिसच्या नफ्यात ९.८% वाढ

सातारा : वडूज येथील लघुउद्योग करणाऱ्या रहिवाशांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी अंगावर रॉकेल ओतून घेताच पोलिसांनी त्यांना अटकाव केला. अग्निशमन दलाच्या वाहनाने पाण्याचा फवारा मारून हे आंदोलन रोखले. यासंदर्भात शहर पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले आहे.
मोहन इगावे, राजेंद्र गोडसे, सचिन गोडसे, सुशांत जाधव, मधुकर गोडसे, विशाल गोडसे, सचिन इगावे, रोहित कदम, सिद्धार्थ कदम, विष्णू गोडसे, अशोक घोरपडे यांनी वडूज येथील गायरान जमिनीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. वडूज येथील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून लघुउद्योग करणारे हे रहिवासी ग्रामपंचायत कर व इतर शासकीय कर भरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. १९६० पासून याठिकाणी लघुउद्योग करत असतानाही त्यांना २ आॅक्टोबरला तहसील कार्यालयातर्फे जागा खाली करण्यासंदर्भात नोटीस काढण्यात आली होती. (प्रतिनिधी)


आंदोलन पाहण्यासाठी गर्दी...
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरू असलेले आंदोलन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. पोलीस आंदोलकांना पकडत असताना अनेकांनी हा ‘इव्हेंट’ मोबाइल कॅमेऱ्यामध्ये क्लिक केला.

Web Title: Infosys's profit increased by 9.8%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.