शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

कास येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प, सातारा शहराला मिळाली तब्बल ३२ वर्षे वीज, त्याकाळी किती आला खर्च..जाणून घ्या

By सचिन काकडे | Updated: January 27, 2025 14:23 IST

सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु

सचिन काकडेसातारा : सत्तावीस किलोमीटर अंतरावरून नैसर्गिक उताराने येणाऱ्या कास तलावाच्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्प साकारता येईल असा विचारही कोणी केला नव्हता; परंतु सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीने ही योजना आखली अन् ती साकारलीही. कास रस्त्यालगत असलेल्या पाॅवर हाऊस येथे भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून शहराला तब्बल ३२ वर्षे वीज पुरवठा सुरू होता.१९३३ साली सातारा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने सांबरवाडीपासून पाॅवर हाऊसपर्यंत नऊ इंच व्यासाची लोखंडी पाईपलाईन आणली. ५३८ फूट उंचीवर येणाऱ्या जलवाहिनीतील पाण्यावर पाॅवर हाऊस येथे वीज निर्मिती होऊ लागली. या योजनेसाठी त्याकाळी १ लाख ८४ हजार रुपये इतका खर्च आला होता. ७५ किलोवॅट वीज निर्मिती क्षमता असलेला हा भारतातील पहिला लघु जलविद्युत प्रकल्प होता.१९३५ ते १९६७ असा ३२ वर्षे या प्रकल्पाने शहराचा पश्चिम भाग प्रकाशमान केला. त्यावेळी कंपनीचे कार्यालय मोती चौकातील दिवाण महाजन वाड्यात होते. कालौघात ही योजना बंद पडली असली तरी सातारा नगरपालिकेकडून या ठिकाणी नव्याने दीड मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभा केला जाणार आहे.

सदर बझारला १०० वर्षे मिळाले पाणी१८९२ साली कासचे पाणी बोगद्यापासून पोवई नाक्यावरील कॅम्प वॉटर वर्क्स येथे जलवाहिनी टाकून आणण्यात आले. सदर बझार भागाला या ठिकाणाहून १९९२ सालापर्यंत तब्बल १०० वर्षे पाणीपुरवठा केला जात होता. रस्ते विकास, बांधकामे, खापरी नळाची मोडतोड अशा अनेक कारणांमुळे हा पाणीपुरवठा इतिहास जमा झाला.

खापरी नळ इतिहास जमासुरुवातीच्या काळात सातारा शहराची तहान भागवण्यासाठी यवतेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस तलावाची उभारणी झाली. या तलावातून येणारे पाणी तसेच वाटेतील झऱ्याचे पाणी एकत्र करून खापरी नळाने ते साताऱ्यात आणले गेले. हे खापरी नळही आता इतिहास जमा झाले असून, यवतेश्वर घाटात हे खापरी नळ आजही नजरेस पडतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारDamधरणWaterपाणीelectricityवीज