जय मल्हार गणपतीला वाढती मागणी

By Admin | Updated: July 31, 2014 23:27 IST2014-07-31T21:06:24+5:302014-07-31T23:27:32+5:30

मालिकांचा प्रभाव : दूरचित्रवाणीची जादू मंडळापर्यंत

Increasing demand for Jai Malhar Ganpati | जय मल्हार गणपतीला वाढती मागणी

जय मल्हार गणपतीला वाढती मागणी

सातारा :गणेशोत्सवात आपली गणेशमूर्ती सर्वात आकर्षक कशी असेल, याचा प्रयत्न मंडळाचे कार्यकर्ते करतात. त्यामध्ये टीव्ही सिरीयलमधील धार्मिक सिरीयलचा आधार पहिल्यांदाच घेतला गेला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील जय मल्हार या मूर्तीला मागणी आहे.महिनाभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी मंडळांनी आपल्या मूर्ती आधीच बुकिंग केल्या आहेत. मागील महिन्यात टीव्हीवर झळकलेली मालिका ‘जय मल्हार’ची क्रेझ सध्या मूर्तिकारांकडे मागणी होत आहे. ‘जय मल्हार’च्या आकारातील मूर्तीला मागणी वाढत आहे; परंतु याला साचा नसल्याने काही ठराविक मंडळांच्या अशा मूर्ती तयार करणे शक्य आहे.गतवर्षी ‘देवों के देव महादेव’ ही मालिका चांगलीच गाजली. त्याचाही परिणाम मागील वर्षी मंडळांनी महादेवाच्या रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या होत्या. यंदा ‘जय मल्हार’ची क्रेझ दिसत असून त्याला मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)
जय मल्हारमध्ये ज्या पद्धतीने तलवार दाखविली आहे, त्याच पद्धतीने श्रींच्या हाती तलवार देण्यात आली आहे. नेहमी गदा, त्रिशूल, चक्र, धनुष्य बघण्याची सवय झाली आहे; परंतु श्रींच्या हाती तलवार बघताना ही मूर्ती खूपच सुबक व आकर्षक वाटत आहे.

Web Title: Increasing demand for Jai Malhar Ganpati