शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:33 IST

सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

सातारा : जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस मोठा झाला नसलातरी मान्सूनच्या पावसाने वेळेत तसेच चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा पेरणी अधिक झाली आहे. तर फलटण तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्यात ११३, खटाव ८८.४९ तर कोरेगाव तालुक्यात ९९.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सर्वसाधारणपणे ६४ हजार ९ हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे ६३ हजार ७५४ आणि भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे ३८ हजार २२७ हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी २४ हजार २०३, मका १८ हजार ५९८, नाचणीचे सर्वसाधारणपणे ५ हजार ८८७ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येतो.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला होता. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ६८ टक्के पेरणी झाली. तर भाताची ८३.१० टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची ११०.८६ टक्के क्षेत्रावर झालीय. तसेच मका ८६, भुईमूग ८२, तूर पिकाची ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या २ लाख ९२ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.फलटण, माणमध्ये बाजरी क्षेत्र वाढले...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगाम घेण्यात येतो. तर प्रत्येक तालुक्यातील पीक पद्धतीही वेगवेगळी आहे. जिल्ह्यातील पेरणी ९३ टक्के झाली असून, यामध्ये फलटण आणि माण तालुक्यांत सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे.

फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ११९.१३ तर माणमध्ये ११२.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटणमध्ये बाजरी, मका, सोयाबीन क्षेत्रांमध्ये वाढ झालीय. तर माणमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढलेले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र