शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सातारा : कास पठाराच्या सुरक्षेत वाढ, खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:10 IST

डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटकांच्या वाहनांचीही कडक तपासणी केली जाणार असून, आग न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपठारावर सततच्या आगीच्या घटना वनविभागाची मोठी डोकेदुखी सिगारेटची थोटके टाकल्याने अथवा खोडसाळपणा केल्यानेच आग

गोडोली : डिसेंबर महिन्याच्या शेवटी लागलेल्या आगीत कास पठारावरील बराच भाग भस्मसात झाल्यानंतर वन विभागाने सतर्क होत कास पठाराच्या सुरक्षेत वाढ करत संयुक्त वन समितीच्या माध्यमातून त्याच परिसरातील खासगी सुरक्षारक्षक पठारावर चोवीस तास पहारा देणार आहेत. तसेच पर्यटकांच्या वाहनांचीही कडक तपासणी केली जाणार असून, आग न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कास पठार हे सुमारे एक हजार आठशे हेक्टरवर विस्तारलेले आहे. विविध वनसंपदेने आणि फुलांनी नटलेले हे पठार आहे. या निसर्गसंपदेची दखल घेत २०१२ मध्ये वर्ल्ड हेरिटेजने कास पठाराचा जागतिक यादीत समावेश केला होता. तेव्हापासून जगभरातील पर्यटकांची पावलेकास पठारवर वळू लागली होती.

कास पठारावरील वनसंपदेची भुरळ पर्यटकांसह अभ्यासकांना पडली आहे. मात्र गत दोन वर्षांत कासवर फुलांचा हंगाम हवा तसा बहरला नव्हता. तरीही पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. हे संयुक्त वनसमितीला मिळालेल्या पंच्यान्नव लाखांच्या करावरून दिसून येते. मात्र कास पठारावर सतत लागत असलेल्या आगीच्या घटना या वनविभागाची मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

पठारावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वनविभागाने जाळ पट्टा मारला आहे. ज्यामुळे चुकून आग लागली तरी त्या पट्ट्याच्या आत जात नाही आणि वनसंपदेचा आगीपासून बचाव होतो. असे असताना आगीच्या घटना घडल्याने वनविभागाने त्याचे कारण शोधले असता या आगी काही उत्साही लोकांनी जाळ पट्ट्याच्या आत जात सिगारेटची थोटके टाकल्याने अथवा खोडसाळपणा केल्यानेच आग लागल्याच्या निष्कर्षाला वनअधिकारी पोहचले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटनfireआगforestजंगल