शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गुन्ह्यांच्या संख्येत वाढ; उघडकीसाठीही प्रयत्न..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:44 PM

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून.

ठळक मुद्दे शिक्षेचे प्रमाणही वाढले : अपघात होऊ नये यासाठी जनजागृतीची मोहीम गरजेची; हेल्मेटसक्ती हवीच

दत्ता यादव ।सातारा : रोज चोऱ्या, मारामाºया घडत आहेतच, शिवाय अपघात अन् फसवणुकीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. रोज शंभरीच्या घरात गुन्हे दाखल होत असताना गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही आता अलीकडे वाढू लागले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात विविध गुन्हे दाखल झाले. त्यापैकीच प्रकर्षाने पुढे आलेला गुन्हा म्हणजे फलटणच्या वडजल भागामध्ये प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा झालेला खून. या खुनाचे कसलेही पुरावे मागे नसताना पोलिसांनी तीन दिवसांत खुनाचा छडा लावून तिघांना अटक केली. या खुनामुळे फलटण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

याशिवाय शिरवळ पोलिसांनी दागिने चोरणाºया आंतरराज्य टोळीतील चौघांना गजाआड केले. गाडीमध्ये बसविलेल्या प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरटण्यात ही टोळी माहीर होती. सातारा, पुणे ग्रामीण, पुणे शहर, नवी मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी या टोळीवर दहा गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा शिरवळ पोलिसांनी छडा लावल्यामुळे अनेकांचा प्रवास आता सुखकर झाला आहे.खंडाळ्यातील एस वळण हे अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. या वळणाने आत्तापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय. काहींनी या वळणाला दोष दिला असून, काहींनी हे वळण योग्य असल्याचे म्हटले आहे. परंतु या वळणावर अपघात झालेल्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

त्यापैकीच एक म्हणजे कंटेनर चालक सागर अशोक जाधव (वय २५, रा. मोही, ता. माण) याला झालेली तीन वर्षांची शिक्षा. निष्काळजीपणे आणि हयगयीने कंटेनर चालवून नऊजणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. अद्यापही या एस वळणावर अपघतांची मालिका सुरूच आहे.

अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. मलकापूर, कºहाड येथील अज्ञात वाहनाच्या धडकेत वैद्यकीय शिक्षण घेणारा अनिरुद्ध धदीच (वय २४, रा. कोयना वसाहत, मलकापूर) याचा मृत्यू झाला. कोरेगाव येथेही अपघातात जखमी झालेल्या मयूर मोहन कदम (वय ३०, रा. कुमठे, ता. कोरेगाव) याचाही खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आयुष्य फुलण्याच्या वेळेतच तरुणांना अपघातामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक तरुण बेभान होऊन वाहने चालवतात. त्यांच्या चुकीमुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागते. यासाठी त्यांच्यावर वचक आवश्यक आहे. महामार्गावरून प्रवास करताना दुचाकीस्वाराला हेल्मेटसक्ती करायला हवी.

अनेकजण हेल्मेटचे ओझे नको म्हणून हेल्मेट घालणे टाळत असतात. मात्र, हेल्मेट त्यांच्या स्वत:च्या आयुष्यासाठी कवच आहे, हे दुचाकीस्वारांना कधी समजणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोलमजुरी करून आयुष्याची जपलेली पुंजी चोरीस गेल्यानंतर अनेक कुटुंबे रसातळाला जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्याने चोरीचा छडा लावावा, अशी अपेक्षा नागरिकांची असते.पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष..रोज अनेक गुन्हे दाखल होत असले तरी पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. अपघातांची मालिका मात्र सुरूच आहेत. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी जनजागृती चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वत: घेतली पाहिजे, असे पोलिसांकडून नेहमी आवाहन करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस