ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:06 IST2017-12-06T15:02:11+5:302017-12-06T15:06:17+5:30
हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ओखीने वाढविला खोक्की, पावसामुळे वातावरणात मोठा बदल, सातारकरांना सर्दी-खोकल्याचा त्रास
ठळक मुद्देहिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना आणले जेरीस ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे
सातारा : हिवाळ्यात सुरू झालेल्या पावसाने सामान्यांना जेरीस आणले आहे. ओखी वादळाच्या येण्याने सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सातारकरांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दोन दिवसांपासून साताऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे घरातील आबालवृद्ध आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर दमट वातावरण आणि रात्री कडाक्याचा गारठा यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आधीच गारठ्यामुळे हैराण झालेल्या सातारकरांना ओखीचा तडाखा सोसवला नाही.