कोयनेत कासवगतीने वाढ

By Admin | Updated: August 17, 2014 00:22 IST2014-08-17T00:22:25+5:302014-08-17T00:22:25+5:30

८९ टक्के भरले : बारा तासांत केवळ तीन मिलीमिटर पाऊस

Increase in cognition | कोयनेत कासवगतीने वाढ

कोयनेत कासवगतीने वाढ

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस अगदीच तुरळक बनला आहे. धरणातील पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होत्या. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याच्या इशारा दिलेले प्रशासनही पाणी वाढण्याची वाट पाहत आहे. धरणात ९३.९८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या बारा तासांत झालेला पाऊस मिलीमिटरमध्ये असा : कोयना ३, नवजा ७, महाबळेश्वर ८.
कोयना धरण भरण्यासाठी आणखी ११ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. मात्र, पाऊसच तुरळक पडत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा ७,५६८ क्युसेक आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी खर्च होत आहे.
जिल्ह्यातील धरणे व त्यातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग क्युसेकमध्ये : धोम वीजगृहासाठी ३५२, सांडव्यातून १५०, कण्हेर ५९९ वीज गृहासाठी, धोम-बलकवडी २२५, नागेवाडी २३०, वांग १,०५७, मोरणा-गुरेघर ९६, तारळी ५२७, उत्तर मांड १७०, निरा-देवधर ७५०. (प्रतिनिधी)

Web Title: Increase in cognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.