खेळाडूंना प्रोत्साहन.. खोटे श्रेय घेणाऱ्यांवर प्रहार!

By Admin | Updated: April 2, 2016 00:17 IST2016-04-01T22:33:37+5:302016-04-02T00:17:26+5:30

क्रिकेट अन् अधिवेशन : साताऱ्यातील नेत्यांच्या नावाने पडलेल्या गुढीपाडव्याच्या पोस्टवर पोलिसांत तक्रार

Incentives to players! | खेळाडूंना प्रोत्साहन.. खोटे श्रेय घेणाऱ्यांवर प्रहार!

खेळाडूंना प्रोत्साहन.. खोटे श्रेय घेणाऱ्यांवर प्रहार!

शेखर जाधव -- वडूज  --टी-२० विश्वचषक स्पर्धेतून भारत बाहेर पडल्यानंतर खेळाडूंवर टीका करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम नेजिझन्सनी केले. माण-खटाव तालुक्यात ९ कोटी ४९ लाख २९ हजार रुपयांचा निधी बंधारे बांधण्याकरिता मंजूर करण्यात आला. याचे श्रेय कोणाचे यावरून आता सोशल मीडियावर रान पेटले आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून हा निधी आणल्याचा दावा आणि त्याला विरोध करणाऱ्या काही पोस्ट या सप्ताहात भलत्याच गाजल्यात.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना अ‍ॅन्डरॉईड मोबाईलची एक वेगळीच क्रेझ पाहावयास मिळत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे भरपूर काही शिकता येत असले तरी चांगल्या कामासाठी याचा वापर कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. व्हॉट्स अ‍ॅपमुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन समाधानकारक जीवन जगणारे अनेकजण आहेत. मात्र, सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे सोशल मीडिया एक व्यासपीठ ठरले आहे.
राजकारण, आणि क्रिकेट वर सध्या सर्वात जास्त सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल होताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुुख्याने भारताचा नामांकित फलंदाज व त्याची प्रेयसी आणि क्रिकेटचे सर्वेसर्वा असणारे राजकीय व्यक्ती यांच्यावर कमेंट असणाऱ्या पोस्टनी अक्षरश: थैमान घातले आहे. तर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर ही समर्थनीय आणि असमर्थनीय पोस्ट नी धुमाकूळ घातला होता.
खटाव तालुक्यात आजअखेर याबाबत कोणावरही पोलिस ठाण्यात तक्रार झालेली नसली तरी काही लोकांच्यात शाब्दिक चकमकी निश्चितच उडाल्या आहेत. तसेच कोणी सिंमेंट बंधारे मंजूर केले म्हणून कौतुकास्पद पोस्ट व्हायरल होत आहेत. तर सत्तेत कोण? आणि ते कोणी मंजूर केले या आशयाच्या पोस्ट देखील सर्व ग्रुपवर फिरत आहेत.
जिल्ह्यातील दुष्काळी भागाची कणव वाटून यंदा कोरडी रंगपंचमीचा प्रसार या माध्यमानेही केला. माणसाबरोबरच प्राणी आणि पक्ष्यांचा विचार करून त्यांच्यासाठीही अंगणात आणि टेरेसवर सपाट भांड्यात पाणी ठेवण्याचे आवाहन गेल्यासप्ताहात मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
एकूण काय या सोशल मीडियामुळे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील घटना समजतात. परंतु त्या कितपत खऱ्या हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. कारण कोणत्याही पोस्टची खात्री न करता फॉरवर्ड करणारा यांच्याबाबत विश्वासार्हताचे प्रमाण फार कमी असते.
ग्रुप सदस्यांची संख्या वाढविण्यासाठीची क्षमता जादा केल्याने अनेकजण प्रत्येक ग्रुपशी संलग्न आहे. त्यामुळे त्याच-त्याच पोस्ट फिरून आल्याने काहीवेळा ग्रुपवरच वादंग निर्माण होताना दिसून येत आहे. तर हा वाद मिटविण्यासाठी अ‍ॅडमिनला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक ग्रुपवर कन्हैय्या कुमार आणि बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात पडलेल्या पोस्टवर भलतेच वादळ उठत आहे. या सर्वांना शांत करण्याची कसरत अ‍ॅडमिनला करावी लागत आहे.


असे आले काही मेसेज
४घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते, तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो. तसेच गुढी बांबूपासून बनलेली असते, धर्मशास्त्रात बांबूचा वापर प्रेतासाठी करतात. कोरे कापड आणि लिंबाची पाने हेदेखील प्रेतासाठी वापरली जातात. मग या गोष्टी शुभ कशा? गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही. उत्तर प्रदेशातील लोकांना गुढीबाबत काहीही माहिती नाही. याबाबत आपल्या युपीतील मित्राकडे खात्री करू शकता. अशी अनेक प्रकारची उदाहरणे या पोस्टमध्ये आली आहेत.
४माणदेशात मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे उगीच श्रेय घेऊ नये अन्यथा माणदेशी जनता आपल्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. आले किती गेले किती भराभरा संपला नाही, संपणार नाही,.... यांचा दरारा!

Web Title: Incentives to players!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.