दक्षिण तांबवेत शाळा खोलीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:47+5:302021-08-18T04:45:47+5:30

सरपंच शोभाताई शिंदे, माजी सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, उत्तम साठे, स्वाती काटवटे, ...

Inauguration of school room in South Tambave | दक्षिण तांबवेत शाळा खोलीचे उद्घाटन

दक्षिण तांबवेत शाळा खोलीचे उद्घाटन

सरपंच शोभाताई शिंदे, माजी सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनंजय ताटे, उत्तम साठे, स्वाती काटवटे, माजी पोलीस उपनिरीक्षक अनिल कारंडे, नायब सुभेदार दत्तात्रय चोपदार, हणमंत साठे, बी.बी. शिंदे, विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी अ‍ॅड. विजयसिंह पाटील, धनंजय ताटे, जावेद मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकमित्र हा आगळावेगळा उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षकमित्र योगिनी कुलकर्णी, स्नेहल यादव, मधुरा शिंदे, दिव्या काटवटे, सागर साठे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच शाळा खोली बांधकामासाठी सहकार्य व भरीव मदत करणाऱ्यांंचाही गौरव करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविक आबासाहेब साठे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Inauguration of school room in South Tambave