शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कासच्या नवीन जलवाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सातारा शहर, उपनगराला मुबलक पाणी मिळणार

By सचिन काकडे | Updated: January 19, 2024 16:47 IST

प्रकल्प दोन वर्षात मार्गी : उदयनराजे यांची माहिती

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या नुतन जलवाहिनीच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आले. या प्रकल्पासाठी शासनाच्या अमृत २.० योजनेतून १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला असून, येत्या दोन वर्षात ही योजना पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.सोलापूर येथे शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आवास योजना, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापण आदी योजनांचे ऑनलाइन उद‌्घाटन करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता, यावे यासाठी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह सातारा विकास व नगरविकास आघाडीचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उद्घाटन सोहळा व पंतप्रधानांचे भाषण झाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहराचा वाढता विस्तार व भविष्यातील पाणीमागणी पाहता कास धरणाची उंची वाढविण्यात आली. या कामामुळे धरणाचा पाणीसाठा पाच पटीने वाढला आहे. पुढील टप्पा जलवाहिनीचा असून, २७ किलोमीटर लांब जलवाहिनीसाठी शासनाच्या अमृत २.० योजनेतून १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेवर १६ दशलक्ष क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र व एक मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर पालिकेच्या वीजबिलात वार्षिक ४ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्णत्वास येणार असून, सातारा शहर व उपनगराला मुबलक पाणी मिळेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीKas Patharकास पठारNarendra Modiनरेंद्र मोदी