आंधळी येथे दाम्पत्याचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; शेताला पाणी देताना रात्री हल्ला

By दत्ता यादव | Updated: October 8, 2023 14:30 IST2023-10-08T14:29:58+5:302023-10-08T14:30:02+5:30

या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

in Satara, Brutal murder of couple in Andhali, attackers run away ; Attacked at night while watering the fields | आंधळी येथे दाम्पत्याचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; शेताला पाणी देताना रात्री हल्ला

आंधळी येथे दाम्पत्याचा निर्घृण खून, हल्लेखोर पसार; शेताला पाणी देताना रात्री हल्ला

सातारा : जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या आंधळी या गावात शनिवारी रात्री दहा वाजता दुहेरी हत्याकांड घडले असून, यामध्ये पती-पत्नीचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
 
संजय रामचंद्र पवार (वय ४९) व पत्नी मनीषा संजय पवार (वय ४८) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य रात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने दोघांच्या डोक्यात, मानेवर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.  यानंतर अज्ञात हल्लेखोर त्या ठिकाणाहून फरार झाले. हा खुनाचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. संबंधित हल्लेखोर कोण आहेत, नेमक्या कोणत्या कारणातून या दापत्याचा खून झाला हे अद्याप समोर आले नसून, या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करीत आहेत.

Web Title: in Satara, Brutal murder of couple in Andhali, attackers run away ; Attacked at night while watering the fields