शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘मला अजून शिकायचंय, मी लग्न करू शकत नाही’ म्हणताच शाळकरी मुलीला भोसकले

By दत्ता यादव | Updated: November 27, 2022 18:59 IST

लग्न करण्यास नकार दिल्याने एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली.

सातारा : लग्न करण्यास नकार दिल्याने एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा राज्यातील एका तरूणाला अटक केली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. विवेक नरहरी शेट्टी (वय २३ मूळ रा. राज्य ओरिसा, सध्या रा. करंजे पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित १६ वर्षांची मुलगी बुधवार, दि. २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अपार्टमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत होती.

त्यावेळी विवेक हा तेथे गेला. ‘तुझे माझ्यावर प्रेम आहे का, मला आता सांग आणि तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही ते पण सांग.’ असे त्याने पीडित मुलीला विचारले. यावर मुलीने ‘अजून मी लहान आहे. मला अजून शिकायचे आहे. माझ्या आई-वडिलांना असे काही केलेले आवडणार नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही,’ असे उत्तर दिले. त्यामुळे चिडून जाऊन विवेक शेट्टीने तिला जवळ ओढून तिच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने भोसकले.  

मुलीने आरडाओरड केल्याने अपार्टमेंटमधील नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस पीडित मुलीची प्रकती चिंताजनक होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. शनिवार, दि. २६ राेजी मध्यरात्री शाहूपुरी पोलिसांनी विवेक शेट्टीवर खुनाचा प्रयत्न करणे, पोक्सो, विनयभंग, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.

‘त्याने’ स्वत:वरही केले वारविवेकने पीडित मुलीवर चाकूने वार केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर आणि हातावरही त्याने वार केले. मात्र, यामध्ये तो गंभीर जखमी झाला नाही. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दोन दिवसांत त्याच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या चार वर्षांपूर्वी विवेक हा त्याच्या भावासोबत  प्लंबिंग  काम करण्यासाठी साताऱ्यात आला आहे.

  

टॅग्स :satara-acसाताराDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी