एकत्र यायचं असेल तर कायमस्वरूपी यावं: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:25 IST2019-01-06T23:25:17+5:302019-01-06T23:25:28+5:30

सातारा : ‘एकत्र यावं, असं मलाही वाटतं; पण वाटून काय होणार. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यांची तशी इच्छा ...

If you want to come together then come back permanently: Udayan Raje Bhosale | एकत्र यायचं असेल तर कायमस्वरूपी यावं: उदयनराजे भोसले

एकत्र यायचं असेल तर कायमस्वरूपी यावं: उदयनराजे भोसले

सातारा : ‘एकत्र यावं, असं मलाही वाटतं; पण वाटून काय होणार. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यांची तशी इच्छा असेल तर माझा नकार नाही. एकत्र यायचं असेल तर कायमस्वरूपी, नाही तर त्याला काय अर्थ ?’ असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाचा चेंडू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे ढकलला.
साताऱ्यात खासदार उदयनराजेंनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे वक्तव्य केले. शनिवारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मनोमिलनाचा निर्णय उदयनराजेंनी घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार उदयनराजे म्हणाले, ‘माझं ओपन मार्इंड आहे. मी स्पष्टवक्ता असून, मला राजकारण करणं जमत नाही. कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ केली नाही. नेहमीच समाजकारण केलं. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. कोणी वाईट केलं, अन्याय होत असेल तिथे मी बोलणार. तडजोडीचे राजकारण मला जमत नाही. शिवेंद्रसिंहराजे बोलले ते योग्यच आहे. आमचे एक घराणे आहे; पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. मी स्वार्थी होऊ शकत नाही. माझ्यापुरतं बघायचं नाही.’
शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा का दाबला? या विषयावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘ते माझे भाऊ आहेत. त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही तर कोणाच्या? मी माझी जबाबदारी स्वत: पेलतो. आता एकत्र यायचं असेल तर कायमस्वरुपी असावं.’
मी विधानसभेची तर ते खासदारकीची तयारी करतात
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शनिवारी वृत्तवाहिनींशी बोलले होते. त्यावेळी त्यांनी मी विधानसभेची तयारी करतो, तर खासदारांची खासदारकीची तयारी सुरू आहे. मी खासदारकीचा उमेदवार कधीच नव्हतो. आमची दोनवेळा समोरासमोर भेट झाली. मनोमिलनाबद्दल कधीच बैठक झाली नाही, असे सांगितले होते.

Web Title: If you want to come together then come back permanently: Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.