कुराणात विवेकवादी विचारांची मांडणी

By Admin | Updated: January 14, 2015 23:50 IST2015-01-14T21:32:54+5:302015-01-14T23:50:35+5:30

बाबूराव गुरव : ‘इस्लाम’ समज-गैरसमज याबाबत जनजागृती अभियान

Ideology of conscience in the Quran | कुराणात विवेकवादी विचारांची मांडणी

कुराणात विवेकवादी विचारांची मांडणी

कऱ्हाड : विवेकवादी विचारांची पहिली मांडणी ‘कुराणा’त झाली आहे़ त्यामुळे मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाने कुराण वाचलेच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ बाबूराव गुरव यांनी केले़
येथील वेणूताई चव्हाण स्मारकात ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘इस्लाम : समज, गैरसमज’ या विषयावर बाबुराव गुरव बोलत होते़ यावेळी इम्तीयाज शेख, नौशाद उस्मान, इकबाल मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गुरव म्हणाले, आजही मुस्लिम समाजात जागृती गरजेची आहे़ हे लोक जागे होत नाहीत, हीच तर विरोधकांची ताकद आहे़ त्यामुळे ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चा हा जनजागरण अभियानाचा उपक्रम स्तुत्य आहे़ यातून जागृती होईल अशी आशा धरायला हरकत नाही़मुळामध्ये धर्म म्हणजे काय ? हे समजून घेतले पाहिजे, स्वामी विवेकानंदांनी माणसांमध्ये दैवत व पूर्णत्व असते; असे सांगितले आहे़ पण दैवत्वाचा साक्षात्कार म्हणजे दैव अन पूर्णत्वाचा साक्षातकार म्हणजे शिक्षण हे मुस्लिम समाजबांधवांनी समजून घेतले पाहिजे़ खरं तर आज प्रत्येकाच्या घरात तुकारामांची गाथा अन् कुराणाची प्रत गरजेची आहे़ आज कुराणाचा मराठीतील अनुवाद उपलब्ध आहे़ तो वाचा म्हणजे इस्लाम म्हणजे काय..? याबाबत आमच्या डोक्यात जे गैरसमज निर्माण झाले आहेत ते दूर होतील अन् इस्लाम चा खरा अर्थ ‘शांती’ आहे हे आम्हाला पटेल़ आज विज्ञान अन अध्यात्म असा वाद घालणं चुकीचं आहे़ कारण धर्माशिवाय विज्ञान आंधळं आहे़ तर विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे़ हे साऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे़ कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी मान्यवर सहभागी झाले होते.नदीम सिद्ीकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले़ (प्रतिनिधी)

़़़तर पश्चिम महाराष्ट्र
शहाणा होईल
कऱ्हाड अन् मिरज ही पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम संख्या अधिक असणारी शहरं आहेत़ इथला मुस्लिम समाज शिक्षित व सुसंस्कृत झाला, तर
पश्चिम महाराष्ट्रातील समाज शहाणा होईल असे डॉ़ गुरव यांनी व्यक्त
केले़

Web Title: Ideology of conscience in the Quran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.