वाई पालिकेचा आदर्श राज्याने घ्यावा
By Admin | Updated: November 11, 2015 00:14 IST2015-11-10T22:12:19+5:302015-11-11T00:14:51+5:30
शरद पवार : प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण; मान्यवरांची मांदियाळी

वाई पालिकेचा आदर्श राज्याने घ्यावा
वाई : ‘वाई मतदारसंघ हा वैविध्यपूर्ण असून, एका बाजूला महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत़ वाई भाग हा कृषिप्रधान आहे, तर खंडाळा परिसरात उद्योगांची भरभराट उदयास येत आहे़ या मतदारसंघात मकरंद पाटील यांनी विकासाचा डोंगर उभाकेला आहे. वाई नगरपालिकेची प्रशासकीय इमारत भव्य असून, तिचा राज्यातील इतर नगरपालिकांनीआदर्श घ्यावा,’ असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी काढले.वाई नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान होणे सोपे आहे; पण नगराध्यक्ष होणे शक्य नाही़ पालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागते़ वाई पालिकेची प्रशासकीय इमारत ही सर्व सोयीनियुक्त असून, नागरिकांनी तिचा चांगला उपयोग करावा.’आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘वाई मतदारसंघ वैविध्यपूर्ण असून, यामध्ये महाबळेश्वर अतिवृष्टीचा तालुका असून, दुसरीकडे खंडाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असते़ त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते़. परंतु खासदार पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत़ ’यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रताप पवार, सर्जेराव जाधव, बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे-पाटील, नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, अरुणादेवी पिसाळ, मोहन जाधव, आनंदराव शेळके-पाटील, दत्तानाना ढमाळ, सुरेखा पाटील, रमेश धायगुडे, उमा बुलुंगे, बाबूराव संकपाळ, राजेंद्र राजपुरे, शशिकांत पवार, दिलीप पिसाळ, सतीश कुलकर्णी, विजयसिंह नायकवडी, अॅड़ अरविंद चव्हाण, पी. डी. पार्टे, सत्यजित वीर, मदन भोसले, महादेव मस्कर, शेखर कासुर्डे, संजय लोळे, दीपक ओसवाल, बाळासाहेब चिरगुटे, भैय्या डोंगरे, दत्ता भणगे, कुमार जगताप, श्रीकांत सावंत, राकेश ओसवाल उपस्थित होते़ नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले़ विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्षा नीलिमा खरात यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
मकरंद आबांचा सत्कार
या कार्यक्रमात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आमदार मकरंद पाटील यांचा खासदार शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी पालिकेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रीकृष्णाची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन करण्यात आले.
यमुनाबार्इंच्या तब्येतीची विचारपूस
पालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगळवारी वाई शहरात आलेल्या खासदार शरद पवार यांनी नियोजित कार्यक्रमातून वेळ काढत पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या घरी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली़