वंशाला दिवा देऊन पण‘ती’ मात्र विझली!

By Admin | Updated: March 17, 2016 23:38 IST2016-03-17T22:13:40+5:302016-03-17T23:38:22+5:30

तान्हुल्यांचा टाहो : जिल्हा रुग्णालयाने दिली अभागी जुळ्यांना आईची माया

But 'I' by giving a lamp to the bridegroom! | वंशाला दिवा देऊन पण‘ती’ मात्र विझली!

वंशाला दिवा देऊन पण‘ती’ मात्र विझली!

सातारा : प्रसूतीनंतर झालेल्या अपत्यांना डोळे भरून पाहण्याचं प्रत्येक आईचं स्वप्न असतं; पण सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील माया पांडुरंग सावंत यांच्या बाबतीत वेगळेचं घडलं. चार मुलींच्या पाठीवर माया सावंत यांनी जुळ्यांना जन्म दिला. पोटच्या गोळ्यांना डोळे भरून पाहण्यापूर्वीच माया यांनी डोळे मिटले. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता या बाळांना जिल्हा रुग्णालय आईची माया देत आहे.
प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्व हे निसर्गाने दिलेले वरदान असले तरी तिच्यासाठी पुनर्जन्मच असतो. तरीही प्रत्येक स्त्री आनंदानं मातृत्व स्वीकारत असते.
सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील माया पांडुरंग सावंत यांच्या बाबतीतही तसेच घडले. माया यांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने पुण्याला हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
सावंत कुटुंबीयांनी त्यांना पुण्याच्या ससूनमध्ये दाखलही केले. तेथे माया यांनी मुलगा व मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला. प्रसूतीत अतिरक्तस्त्राव झाल्याने माया यांचा मृत्यू झाला.
आईच्या मायेविना पोरकं झालेल्या नवजात बालकांचा टाहो नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या हृदयाचा थरकाप उडविणारा होता.
या बाळांवर वेळीच योग्य इलाज व्हावेत म्हणून सुनील काटे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वीय सहायक महेंद्र जाधव यांनी दूरध्वनी करून याची माहिती दिली. जाधव यांनी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले.
या दोन्ही बाळांवर सध्या जिल्हा रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील मुलाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

आजी विरहाचे दु:ख
बाजूला ठेवून मदत
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वीय सहायक महेंद्र जाधव यांच्या आजी कृष्णाबाई जाधव यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर भुर्इंजच्या कृष्णाकाठी अंत्यसंस्कार सुरू असतानाच मित्र सुनील काटे यांचा फोन आला. त्यांनी आपले दु:ख बाजूला ठेवून तान्हुल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: But 'I' by giving a lamp to the bridegroom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.