पतीने मित्रांना सोबत घेऊन मारला सोन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST2021-07-18T04:27:27+5:302021-07-18T04:27:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: तालुक्यातील ढगेवाडी येथे एका घरातून दस्तूरखुद्द पतीनेच ४५ हजारांच्या सोन्याच्या ऐवजांवर डल्ला मारला असल्याची तक्रार ...

The husband took his friends with him and killed him | पतीने मित्रांना सोबत घेऊन मारला सोन्यावर डल्ला

पतीने मित्रांना सोबत घेऊन मारला सोन्यावर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: तालुक्यातील ढगेवाडी येथे एका घरातून दस्तूरखुद्द पतीनेच ४५ हजारांच्या सोन्याच्या ऐवजांवर डल्ला मारला असल्याची तक्रार पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पती आणि त्याचे दोन मित्र असा तिघांवर गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, पतीनेच दोन मित्रांच्या मदतीने घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे ढगेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हिराबाई विजय जाधव (वय २६, रा. ढगेवाडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिराबाई यांचा पती विजयदादा जाधव आणि त्याचे मित्र नीलेश बाजीराव फरांदे (रा. आनेवाडी, ता. सातारा) आणि सचिन तात्याबा बरकडे (रा. ढगेवाडी, ता. सातारा) या तिघांनी राहत्या घरात असणाऱ्या लाकडी शोकेसच्या कपाटातील कपड्याच्या खाली असणाऱ्या डबीमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपयांचे मनी मंगळसूत्र चोरुन नेले. हा प्रकार ८ जुलै ते १५ जुलै रोजी सायंकाळी पाच या वेळेत घडला आहे. याप्रकरणी हिराबाई यांनी शुक्रवार, १६ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विजय जाधव, नीलेश फरांदे आणि सचिन बरकडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक फौजदार बागवान हे करत आहेत.

Web Title: The husband took his friends with him and killed him