शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: कलेढोणमध्ये गळा आवळून पत्नीचा खून, दोन तासात आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:49 IST

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये बुधवारी रात्री पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये बुधवारी रात्री पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासांतच संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. मंगल उर्फ सुमन सखाराम जाधव (वय ३९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सखाराम जाधव (वय ४५) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.मुळगाव नसरापूर किल्ले मच्छिंद्र जवळ असलेले व सध्या कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये मंगल उर्फ सुमन सखाराम जाधव, पती सखाराम जाधव व दोन मुले असे वास्तव्यास आहेत. त्यातील लहान मुलगा मूळगावी येथे राहिला आहे तर मोठा २१ वर्षाचा मुलगा आई-वडिलांबरोबरच राहतो.बुधवारी रात्री मंगल सखाराम जाधव व पती सखाराम यांच्यामध्ये शाब्दिक भांडण सुरू होते. ‘तुला ठेवतच नाही, तुला मारूनच टाकतो’ अशा स्वरूपाचे शाब्दिक भांडण सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. पहाटे फिरायला जाणाऱ्या मंगल जाधवच्या भावाने दरवाजा उघडा आहे म्हणून घरात पाहिले असता बहीण मंगल मृतावस्थेत पडली असल्याचे लक्षात आले.खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिस पाटील सचिन शेटे यांना मिळाली. त्यानंतर शेटे यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.या ठिकाणची परिस्थिती व परिसरातील माहिती घेऊन खुनाचा संशयित आरोपी पती सखाराम जाधव असावा, असा अंदाज बांधून त्यांनी तत्काळ संशयित आरोपीला पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दोन तासांच्या आतच त्याला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून पकडण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी दिवसभर या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस