शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या रक्षाविसर्जनादिवशी पतीचे निधन, सातारा जिल्ह्यातील वडूज येथील हृदयद्रावक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:18 IST

वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वडूज येथे घडली. शोभा महावीर उपाध्ये (वय ...

वडूज : पत्नीच्या रक्षाविसर्जन विधीदिवशीच पतीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची हृदयद्रावक घटना वडूज येथे घडली. शोभा महावीर उपाध्ये (वय ७०), महावीर भुजबल्ली उपाध्ये (७५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.कर्नाटकातील शेडबाळ (ता. अथणी) येथील मूळ रहिवासी असलेले उपाध्ये दाम्पत्य २५ वर्षांपासून वडूजमध्ये स्थायिक झाले होते. येथील जैन मंदिराचे पुजारी म्हणून ते काम पाहत होते. मंदिरातील पूजाअर्चा अशा धार्मिक विधीबरोबरच ते सामाजिक कार्यक्रमातही हिरिरीने सहभागी होत होते. शोभा उपाध्ये या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. सोमवार, दि. ५ रोजी त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांचा रक्षाविसर्जन विधी झाला होता. रात्री आठ वाजता महावीर उपाध्ये यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.उपाध्ये दाम्पत्याच्या पश्चात तीन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. पंडित दिनेश उपाध्ये यांचे ते आई-वडील होत व चांदवड (नाशिक) येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमाचे मुख्य कार्यालयातील लिपिक नीलेश अजमेरा यांचे सासू-सासरे होत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका