शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

Crime News Karad: वहागावात प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून; प्रियकर ताब्यात, महिला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 18:11 IST

शेतात भाडेतत्त्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करून त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला.

कऱ्हाड : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने निर्घृण खून केला. तसेच शेतात जेसीबीने पंधरा फूट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकला. वहागाव, ता. कऱ्हाड येथे घडलेली ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढला असून, रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याची कार्यवाही सुरू होती.बरकत खुदबुद्दीन पटेल (वय २८, रा. वहागाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. वहागाव येथील बरकत पटेल हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार चार दिवसांपूर्वी तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांकडून त्याबाबतचा तपास सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत बरकतच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला.  चार दिवसांपूर्वी खूनबरकतच्या पत्नीचे गावातीलच एका युवकाशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती बरकतला मिळाली होती. त्यामुळे तो पत्नी व त्या युवकाशी वाद घालत होता. पती आपल्या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकराने सुमारे चार दिवसांपूर्वी बरकतचा खून केला.जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतलातत्पूर्वी संबंधित युवकाने आपल्या शेतात भाडेतत्त्वावर जेसीबी बोलावून खड्डा खणून घेतला होता. खड्ड्यामध्ये पाण्याची टाकी बांधायची आहे, असे त्याने जेसीबीच्या ऑपरेटरला सांगितले होते. खड्डा खोदल्यानंतर बरकतचा खून करून त्याचा मृतदेह त्या खड्ड्यात टाकण्यात आला. तसेच थोडीफार माती ओढून तो खड्डा बुजविला.दुसऱ्या दिवशी पुन्हा जेसीबी बोलावून पाण्याची टाकी बांधण्याचे काम रद्द झाले असल्याचे सांगून त्या युवकाने खड्डा पूर्णपणे बुजवून घेतला.  हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी  उशिरा संबंधित खड्डा खोदून त्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.प्रियकर ताब्यात, महिला पसारपोलिसांनी याप्रकरणी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. तर महिला पसार झाली आहे. संबंधित महिला दोन दिवसांपासून गावातून पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारी