शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूमध्ये पत्नीचा खून केला, मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघाला; पतीला शिरवळ येथे अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:36 IST

पतीचा आत्महत्येचा प्रयत्न 

शिरवळ (जि. सातारा) : बंगळुरू येथून परत मुंबईला राहण्यासाठी जाऊ या, असे पत्नी वारंवार म्हणत भांडणे करत होती. यातून होणाऱ्या वादातून पत्नीचा चाकूने खून करून मृतदेह बॅगेत भरून कारने मुंबईच्या दिशेने निघालेल्या पतीला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

पत्नीच्या खुनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बंगळुरू पोलिसांच्या स्वाधीन केले. विष प्राशन केल्याने शिरवळ येथील खासगी रुग्णालयातून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले.गौरी राकेश खेडेकर (वय ३२) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राकेश राजेंद्र खेडेकर (३५, दोघे सध्या रा. बनारगट्टा, तेजस्विनीनगर, बंगळुरु, मूळ रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.राकेश खेडेकर हा मुंबई येथून बंगळुरुला पत्नी गौरी हिच्यासह कामानिमित्त स्थायिक झाला. बुधवार, दि. २६ च्या मध्यरात्री एकच्या सुमारास राकेशकडे गौरी हिने मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. यावरून दोघांमध्ये वादंग झाला. वाद वाढला असता राग अनावर झालेल्या राकेशने पत्नी गौरी हिच्या हातातील चाकू घेत तिच्या मान, गळा, पाठीवर चाकूने वार केले.यामध्ये गौरीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राकेशने घरातील मोठ्या बॅगेत गौरीचा मृतदेह भरून गुरुवार, दि. २७ च्या मध्यरात्री बाराच्या दरम्यान घरातील साहित्य सोबत घेऊन कारमधून (एमएच- ०२, जेपी- २८६६) जोगेश्वरी, मुंबई येथे जाण्यासाठी निघाला. वाटेत एका औषधाच्या दुकानातून फिनाईल व झुरळ मारण्याचे विषारी औषध घेतले. तसेच बंगळुरु येथील एका व्यक्तीला फोन करून पत्नी गौरीच्या खुनाबाबत माहिती दिली. संबंधित व्यक्तीने याबाबत बंगळुरु पोलिसांना माहिती दिली.यावेळी राकेश खेडेकरने खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी हद्दीत महामार्गावर विषारी औषध प्राशन केले. अत्यवस्थ वाटल्याने एका दुचाकीचालकाने त्याला शिरवळ येथील खासगी रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी शिरवळ पोलिसांना राकेशने खुनाची माहिती दिली.

मृतदेह घेतला पोलिसांनी ताब्यातराकेश कारने येत असताना त्याने बंगळुरुमध्ये राहत असलेल्या इमारतीतील एका व्यक्तीला फोन करून घटनेची माहिती दिली. संबंधित व्यक्तीने ही माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकMumbaiमुंबई