हुंबराच्या झाडाचे उद्यानात पुनर्रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:38+5:302021-06-09T04:47:38+5:30
या वेळी, पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, एनव्हायरो नेचर फ्रेंड क्लबचे अध्यक्ष ...

हुंबराच्या झाडाचे उद्यानात पुनर्रोपण
या वेळी, पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, एनव्हायरो नेचर फ्रेंड क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशिद, विनायक कदम, विनायक भस्मे व नागरिक उपस्थित होते.
शिवीजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष आहेत. यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. उद्यान व सोसायटी परिसरातील झाडांचे अत्यंत चांगल्या प्रकारे संगोपन करण्यात येते. त्यामुळे घराजवळ उगवलेल्या हुंबराच्या झाडाचे शिवाजी हौसिंग सोसायटीच्या उद्यानात पुनर्रोपण करण्यात आल्याचे सागर बर्गे यांनी सांगितले. साधरणत: एक ते दीड वर्षाचे हे झाड आहे.
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या शिवाजी हौसिंग सोसायटीतील उद्यानात हुंबराच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले. या वेळी हणमंतराव पवार, चंद्रकांत जाधव, सागर बर्गे, प्रा. जालिंदर काशिद उपस्थित होते.