शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गणेशोत्सवात पाहायला मिळणार माणुसकीचा देखावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:02 PM

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं आहे. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं मान्यवरांनी ठरवलं आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात संवेदनशील माणुसकीच्या खºया देखाव्याचे दर्शन घडणार आहे.आपले सख्खे शेजारी असणाºया सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाने हैदोस घातला आणि अगदी सगळं होत्याचं नव्हतं केलं. या परिस्थितीतही पूरग्रस्त उभं राहत असताना त्यांना बळ देण्याचं आवाहन ‘लोकमत’ने गणेशोत्सव मंडळांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत साताºयातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी यंदा देखावामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं निश्चित केलं आहे. देखाव्यात होणाºया अतिरिक्त खर्च पूरग्रस्तांच्या उभारणीसाठी देण्याचंही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितलं आहे. संकटकाळात मदत करण्याच्या सातारकरांच्या या वृत्तीमुळे सांगली कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना पुन्हा नव्यानं उभं राहण्याचं बळ मिळणार आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांसह स्वंयसेवी संस्थांचाही पुढाकार अपेक्षित आहे.यांनी ठरवलं यंदा नो जिवंत देखावा...साताºयातील बाल विकास गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ, राजकमल गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, श्री फुटका गणेशोत्सव मंडळ शनिवार पेठ, गजराज गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, सोमवार पेठ, खणआळी गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा, समर्थ गणेशोत्सव मंडळ, मंगळवार पेठ समर्थ मंदिर आणि मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, राजपथ सातारा.पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची एकी हवी!नैसर्गिक आपत्तीमुळे सातारा शहरातील जिवंत देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळांनी हे देखावे रद्द करून त्याचा निधी पूरग्रस्तांकडे देण्याचं निश्चित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर उत्सव काळात सातारकरांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन पूरग्रस्तांना खंबीर मदत करण्याचं ठरवलं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकरांची एकी हवी. इच्छुक मंडळांनी ‘लोकमत’शी संपर्क साधावा.