महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट वाहनांनी कोंडला, प्रचंड वाहतूक कोंडी
By सचिन काकडे | Updated: November 25, 2023 14:01 IST2023-11-25T14:01:31+5:302023-11-25T14:01:52+5:30
सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट वाहनांनी कोंडला, प्रचंड वाहतूक कोंडी
सातारा : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटात खासगी आराम बस शनिवारी दुपारी दीड वाजता बंद पडल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. हजारो वाहनांची चाके जागेवरच थांबल्याने घाटात सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
शनिवार, रविवारमुळे पाचगणी व महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. शनिवारी सकाळपासूनच या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. दुपारी दीड वाजता हॅरीसन फॉलीपासून जवळच असलेल्या एका वळणावर शैक्षणिक सहल घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने निघालेली आराम बस बंद पडली. त्यामुळे वाई व पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहने जागेवरच थांबली. दोन्ही बाजूला सुमारे चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली असून, वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.