शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांना रोज मिळणार पाणी; महादरे तलाव भरला, ‘कास’ भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:27 IST

कपातीचे संकट टळणार 

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणातील साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरण लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे. शिवाय पश्चिमेकडील हत्ती व महादरे ही तळीदेखील तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शहरात दीड महिन्यापासून सुरू असलेली पाणीकपात आठ दिवसांत बंद करण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे.सातारा पालिकेने कास योजनेच्या पाणीपुरवठ्यात ७ मेपासून कपात केली आहे. पालिकेने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार कास योजनेवरील सर्व पेठांचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जात आहे. दरवर्षी साधारण दोन ते अडीच महिने सातारकरांना पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागतो; परंतु, यंदा मे महिन्यातच वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. शिवाय पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मान्सूनचा जोरही वाढला आहे. परिणामी, धरणे तसेच तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.पश्चिमेकडील कास धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला असून, ६१ फूट क्षमता असलेल्या या धरणात आता ५६ फूट पाणीसाठा झाला आहे. महादरे तळेदेखील महिनाभर आधीच तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात बंद करण्याबाबत पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांत कपात बंद करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दृष्टिक्षेपात पाणीसाठा

  • जुन्या कास तलावाची साठवण क्षमता : २५ फूट
  • नवीन धरणातील साठवण क्षमता : ६१ फूट
  • सध्याचा पाणीसाठा : ५६ फूट
  • प्रतिदिन होणारा पुरवठा : ७५ लाख लिटर

मान्सून सक्रिय झाल्याने कास धरण वेळेपूर्वीच भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीच्या एअर वॉल्व्हला गळती लागली आहे. ती काढण्याचे काम प्रगतिपथावर आहे. काम पूर्ण होताच पाणीकपात बंद करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत व नियमित केला जाईल. - अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा