कऱ्हाड, सातारमधील घरफोड्या उघडकीस

By Admin | Updated: April 12, 2016 00:41 IST2016-04-11T22:38:46+5:302016-04-12T00:41:05+5:30

तिघांना कोल्हापुरात अटक : चैनीसाठी चोऱ्या; दोन लाखांचा माल जप्त

The house burglar in Karhad, Satara exposed | कऱ्हाड, सातारमधील घरफोड्या उघडकीस

कऱ्हाड, सातारमधील घरफोड्या उघडकीस

कोल्हापूर : कोल्हापुरात एटीएम फोडण्यासाठी जाताना दसरा चौकात दोघांना सोमवारी राजारामपुरी पोलिसांनी पकडले तर तिसऱ्या साथीदाराला साताऱ्यातून अशा तिघांना अटक केली. अटक केलेले दोघे सांगली जिल्'ातील तर एक सातारा जिल्'ातील आहे. या तिघांकडून सोने, चांदीचे दागिने, कॅमेरा, मोबाईल असा सुमारे दोन लाखांचा माल जप्त केला.
या घरफोडीचा म्होरक्या लक्ष्मीकांत ऊर्फ सचिन इटकरकर (वय २०, रा. शाहूनगरी दुसरी गल्ली, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), शुभम महादेव पोळ (१९ नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) व अक्षय अशोक शिंदे (२० मूळ गाव कुडाळ ता. जावळी, जि. सातारा, सध्या राहणार पशुवैद्यकीय दवाखाना निवासस्थान गोडोली ता. सातारा, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. या तिघांनी कऱ्हाड व सातारा या दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमृत देशमुख म्हणाले, शहरातील एका ठिकाणचे एटीएम फोडण्यासाठी दोन तरुण जाणार असल्याची व ते दोन तरुण दसरा चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दसरा चौकात टेहळणी सुरू केली. त्यावेळी दोन तरुण या चौकातील एका कठड्यावर बसले होते. पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने लक्ष्मीकांत इटकरकर व दुसऱ्याने शुभम पोळ आपले नाव असल्याचे सांगितले. या दोघांना ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणले. त्यांनी कऱ्हाड व साताऱ्यामध्ये दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे चौकशीत सांगितले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तिसरा साथीदार अक्षय शिंदे हाही घरफोडीमध्ये सहभागी असल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी सातारा येथून अक्षय शिंदेला ताब्या
त घेऊन कोल्हापूरला सायंकाळी आणले.
या तिघांनी कऱ्हाड येथील विद्यानगरमधील राहणारे सागर सर्जेराव कदम यांच्या घरी दि. १७ फेबु्रवारी २०१५ मध्ये बंद बंगल्यामध्ये पाठीमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश करून त्यांच्या घरातील सोने व चांदीचे दागिने, एक कॅमेरा, मोबाईल व इतर कागदपत्रे असा सुमारे एक लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर दि. २४ नोव्हेंबर २०१४ ला सातारा येथील सदर बाजार याठिकाणी राहणारे प्रदीपकुमार गणपतराव शिंदे यांच्या घरातून सोन्याचे गंठण असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. कऱ्हाडमधील चोरीचा माल इस्लामपुरातील मित्र गणेश पाटोळे याला विकला व साताऱ्यामधील चोरलेले सोन्याचे गंठण अल्फास शेख या इसमास विक्री केले असल्याची कबुली या तिघांनी दिली. या तिघांना सोमवारी रात्री उशिरा राजारामपुरी पोलिसांनी कऱ्हाड पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, सहाय्यक फौजदार राजू वरक, पोलिस हवालदार इकबाल महात, किरण गवळी, अशोक पाटील, मिलिंद नलवडे, राजेश होळी, सागर साळुंखे, युवराज पाटील, गौरव चौगुले, निवास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर केदार, अमोल अवघडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना जाधव, समीना मुल्ला यांनी केली.

Web Title: The house burglar in Karhad, Satara exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.