शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

Satara: फलटणमध्ये हनीट्रॅपचा 'माया'जाल, हॉटेल व्यवसायिकाला लुटले; महिलेसह सात जणांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:49 IST

फलटण : शहरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी घेऊन जात मारहाण करुन ...

फलटण : शहरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी घेऊन जात मारहाण करुन ४ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या टोळीतील एका महिलेसह सात जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी  संशयित उमेश संजय खोमणे (वय २८ वर्ष, रा. खराडेवाडी, ता.फलटण), गणेश बाळु मदने (१९ वर्ष, रा. पाचसर्कल, खामगाव), कुमार उर्फ बोक्या लक्ष्मण शिंदे (२७, रा. भाडळी खुर्द), जयराज उर्फ ​​स्वागत आनंदराव (२६, रा. झिरपवाडी), आकाश काशिनाथ डांगे (३०, रा. भाडळी बु. ता फलटण), माया (टोपण नाव) व अनिल गजरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सजल विलास दोशी (वय ३७, रविवारपेठ फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, मागील चार महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये एक महिला अधून मधून जेवणाचे पार्सल नेण्यासाठी येत होती. सदर महिलेचा मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे होता. तिचे नाव 'माया' असे ती सांगत होते. एवढीच माहिती त्यांच्याकडे होती. सदर महिला व त्यांची ओळख झाल्यानंतर दिनांक ३० रोजी तरुण हॉटेल व्यवसायिका सोबत ती फिरायला जाण्यासाठी तयार झाली.सदर महिलेला सुरवडी या ठिकाणावरून त्यांच्या मोटरसायकलवर घेतले. लोणंद, वीरधरण या ठिकाणाहून फिरुन येत असताना काळज-बडेखान जवळ दोन इसमानी त्यांना अडवून "आमच्या बहिणीला घेऊन कुठे घेऊन फिरता" असे म्हणून मारहाण केली. यावेळी सदर महिला त्या ठिकाणावरून निघून गेली. त्यानंतर दोशी यांना संशयित इसम त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करणार आहेत अशी धमकी देत होते. बळजबरीने फोन पे द्वारे २६ हजार रुपये घेतले आणि आणखी ४ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. नाही तर नग्न फोटो व बलात्कार केल्याबाबत वदवुन घेतलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.पोलिसांनी गोपनीय माहिती काढून सदर महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. फलटण शहरांमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार तिच्यासोबतच्या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित सदर महिलेच्या मदतीने फिर्यादी दोशी यांना लुटत होते. या टोळीने फलटण, लोणंद भागात अनेकांना यापूर्वी हनीट्रॅपमध्ये अडकवलेले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांनी आपल्या संबंधित पोलीस ठाण्याशी किंवा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस