लोणंदमधील सफाई कामगारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:32 IST2021-05-03T04:32:54+5:302021-05-03T04:32:54+5:30

लोणंद : येथील लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने सफाई कामगार व कोरोना योद्धयांचा महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची ...

Honoring the cleaners in Lonavla | लोणंदमधील सफाई कामगारांचा सन्मान

लोणंदमधील सफाई कामगारांचा सन्मान

लोणंद : येथील लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने सफाई कामगार व कोरोना योद्धयांचा महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता, सेवा देणाऱ्या लोणंद नगर पंचायतीच्या घंटागाडीचे चालक भोईटे यांचा टॉवेल-टोपी देऊन व‌ ओला‌ व सुका‌ कचरा वेगवेगळा ‌करून त्याची विल्हेवाट लावून ‌आपले‌ शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कष्ट करणाऱ्या कमलताई ‌भिसे यांचा साडी-चोळी ‌देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कोरोनामध्ये जीव गमावलेल्या नागरिकांवर अंत्यविधी करणारे रमेश बिडलान, धनंजय वायदंडे, हिंदूराव लोंढे, गणेश ‌सासर, महेश मेंढे यांचाही प्रतिष्ठानच्या‌वतीने ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक आण्णा जाधव यांच्या ‌हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भाटिया व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Honoring the cleaners in Lonavla