शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:51 IST

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.सातारा शहराच्या आसपास कोणतीही नदी अथवा मोठा तलाव नाही. पाणी असेल तरच एखाद्या गावाचा, शहराचा विकास होतो. ही बाब ओळखून सातारा शहर बसविणा?्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी स्थापत्य तंत्राचा कल्पकतेने वापर करून शहरात पाणी खेळवले. ठिक ठिकाणी दगडांचे हौद आणि तलाव बांधले. यातील एक तलाव म्हणजे महादरे.प्रतापसिंह महाराज थोरले यांनी १८२९ रोजी महादरे तलावाची उभारणी केली. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा तलाव स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. दोन दशकांच्या कालावधी प्रथमत: सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीनेदोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ बाहेर काढण्यात आला.

या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४ कोटी ७२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. मात्र गाळामुळे केवळ ४ कोटी २२ लाख ५० हजार लिटर इतका पाणीसाठा होत होता. गाळ काढण्यात आल्याने यामध्ये पुन्हा ५० लाख लिटरने वाढ झाली आहे.

सातारा तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसावर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. व्यंकटपुरा पेठ येथील रहिवाशांना या तलावातून दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.पालिकेने लक्ष द्यावे !महादरे तलाव व परिसर निसर्ग संपन्न आहे. त्यामुळे येथे भटकंतीसाठी येणा?्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पालिकेने सुरक्षिततेसाठी तलावाला तारेचे कुंपण घातले असले तरी काही हौशी तरुण तलावाच्या कडेला बसूनच मद्यपान करत आहेत. असे प्रकार सातत्याने होत असून, एखादी विपरीत घटना घडण्यापूर्वी पालिकेने मद्यपींवर कारवाई करण्याबरोबरच याठिकाणी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरwater scarcityपाणी टंचाई