कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:46 IST2019-04-09T17:45:42+5:302019-04-09T17:46:30+5:30
काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले.

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी
कºहाड : काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. त्यातील एक मृतावस्थेत तर दुसरा जिवंत आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील काले येथील उसाच्या शिवारात सध्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू आहे. संबंधित ठिकाणी कारखान्याची ऊसतोड टोळीतील मजुरांकडून ऊसतोड सुरू असताना टोळीतील मजुरांना एका शेतात बिबट्याची दोन बछडी आढळून आली. त्यांनी याबाबतची माहिती कºहाडचे वनविभागातील वनअधिकारी डॉ. अजित साजने यांना दिली. मिळालेल्या माहितीनंतर वनअधिकारी डॉ. साजने यांनी तत्काळ वैद्यकीय अधिकाºयांच्या पथकासह संबंधित घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांना दोन बछड्यांपैकी एक मृतावस्थेत तर दुसरा जिवंत अवस्थेत आढळून आला. दोन्ही बछड्यांना वनअधिकाºयांनी ताब्यात घेतले असून, त्यातील मृत बछड्याचे पंचनाम्याचे काम दुपारी सुरू होते.