नदीकाठच्या लोकांसाठी हायअलर्ट, कुुटुंबावर पुन्हा स्थलांतराची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:42 IST2019-09-05T16:40:29+5:302019-09-05T16:42:35+5:30
सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ हजार ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कण्हेर, उरमोडी, धोम या प्रमुख धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

नदीकाठच्या लोकांसाठी हायअलर्ट, कुुटुंबावर पुन्हा स्थलांतराची वेळ
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ हजार ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कण्हेर, उरमोडी, धोम या प्रमुख धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने नदीकाठच्या लोकांना हायअलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या कुटुंबांवर पुन्हा स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १६ हजार ४0९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. माण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यांत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे.
आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे
सातारा- २२.८८ मि. मी., जावळी- ५१.0२ मि.मी. पाटण- ४0 मि.मी., कऱ्हाड - १२.६२ मि.मी., कोरेगाव- ९.२२ मि.मी., खटाव- ३.३३ मि.मी., माण- 0 मि.मी., फलटण- २.७८ मि.मी., खंडाळा- ३.२५ मि.मी., वाई- २0.३४ मि.मी., महाबळेश्वर- १६७.४८
कोयना धरणक्षेत्रात कोयना १४५ मि.मी., नवजा ३१६ मि.मी., महाबळेश्वर १५७ मि.मी. एवढया पावसाची नोंद झाली आहे.