नवप्रकाश मंडळ भगवा कट्टाकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:32+5:302021-09-18T04:41:32+5:30
वाई : गंगापुरी, वाई येथील नवप्रकाश मंडळ भगवा कट्टाकडून गणेशोत्सवानिमित्त सामाजिक दायित्व म्हणून कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशन यांना ...

नवप्रकाश मंडळ भगवा कट्टाकडून मदत
वाई : गंगापुरी, वाई येथील नवप्रकाश मंडळ भगवा कट्टाकडून गणेशोत्सवानिमित्त सामाजिक दायित्व म्हणून कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशन यांना ११ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिवदे यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन कदम यांस धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी डॉ. नितिन कदम यांनी नदी सेवाकार्याचे काम व डागडुजीकरण या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. तसेच नवप्रकाश मंडळ राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे काैतुक केले. तसेच वाई शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी कृष्णा सेवा समितीस मदत करून नदी स्वच्छतेच्या कामात सहभागी हाेण्याचेही प्रा. कदम यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी कृष्णा सेवा समितीच्या वतीने नगरसेवक भारत खामकर यांनीही सेवा समितीच्या कार्याचा आढावा मांडला. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते भैया सकुंडे, अनिल गोळे, अमित देशमाने, संतोष सकुंडे, आशिष पाटणे, अनिल चव्हाण, कृष्णा सेवा समितीचे कार्यकर्ते अमित सोहोनी, कुमार पवार, गणेश जाधव, विवेक चिंचकर, अमाेल मुळीक, हिंदवी भाटे, तसेच मंडळाचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते. अमित देशमाने यांनी आभार मानले.