हॅलो ८साठी.... जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांची महापालिकेस भेट
By Admin | Updated: May 3, 2014 14:35 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:35:15+5:30
जम्मू काश्मीर येथील बसेरा-ए-तबस्सूम व फा या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज(शुक्रवार)महापालिकेस सदिच्छा भेट दिली. महापौर सुनिता राऊत यांनी या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

हॅलो ८साठी.... जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांची महापालिकेस भेट
कोल्हापूर : जम्मू काश्मीर येथील बसेरा-ए-तबस्सूम व फा या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज (शुक्रवार) महापालिकेस सदिच्छा भेट दिली. महापौर सुनिता राऊत यांनी या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन या संस्थेतर्फे काश्मीर खोर्यातील कुपवाडा येथे या आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळेतील काश्मिरी पंडितांची मुले कोल्हापूर अभ्यास दौर्यावर आली आहेत. महापालिकेच्या भेटी दरम्यान शहरातील विविध विकासकामांची व महापालिकेची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. तसेच संस्थेच्या वतीने आश्रमशाळेच्या शिक्षिका रंजनी बगोत्रा व राणी दोशी यांनी संस्थेच्यावतीने काश्मीर खोर्यात मुलींच्या शिक्षणासाठी चालविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तेथील परिस्थिती सांगितली. यावेळी तानीया भट व काजल भारती या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत कोगेकर, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, मुरलीधर जाधव, राजू लाटकर, आदील फरास, परीक्षित पन्हाळकर, सतीश लोळगे, महेश गायकवाड, सुभाष रामुगडे, माजी नगरसेवक अजित राऊत, गणी आजरेकर, साहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी दीपक गायकवाड, आदीसह अधिकारी उपस्थित होते.