साताऱ्यात पावसाच्या जोरदार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:32+5:302021-09-10T04:47:32+5:30
सातारा : सातारा शहरासह परिसरात गुरुवारी पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. यामुळे शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्याचबरोबर कधी ...

साताऱ्यात पावसाच्या जोरदार सरी
सातारा : सातारा शहरासह परिसरात गुरुवारी पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. यामुळे शहरातील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्याचबरोबर कधी ऊन-पावसाच्या खेळाची अनुभूतीही दिसून आली.
सातारा शहरासह परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. सुरुवातीला दोन दिवस सायंकाळी सहानंतर पाऊस पडत होता. मात्र, बुधवारपासून दिवसाही पाऊस पडू लागला आहे. तर गुरुवारी पहाटेपासून सकाळी १० पर्यंत शहर व परिसरात चांगला पाऊस पडला. त्यानंतर सूर्यदर्शन झाले; पण दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी पडल्या. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. विक्रेत्यांचीही धावपळ उडाली. सातारकरांना खरेदीसाठी बाहेर जाताना रेनकोट, छत्रीचा आधार घ्यावा लागला. त्यातच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सातारकरांनी सायंकाळच्या सुमारास मोती चौक, राजवाडा परिसरात मोठी गर्दी केली होती; पण पाऊस सुरू होताच सर्वांचीच तारांबळ उडाली.
...........................................................