शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:32 IST

सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठा

सातारा : सातारा शहरात पावसाची उघडझाप असून, पश्चिम भागात जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने साठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणात ५६ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्याची सुरुवातही पावसाने झाली आहे. त्यातच मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. सध्या पश्चिमेकडील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात कोयनानगरमध्ये ५८ मिलिमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५९ मिलिमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण पाणीसाठा ५६.०३ टीएमसी झालेला असून, पाणीसाठ्याची टक्केवारी ५३.२४ इतकी आहे.२४ तासांत धरणात सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यातच धरणातील साठा वेगाने वाढत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदी विमोचक द्वारमधूनही विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग वाढणार आहे. परिणामी कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठाजिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने या मोठ्या प्रकल्पात एकूण ८४.२१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झालेला आहे. याची टक्केवारी ५६.६२ इतकी आहे. या प्रमुख धरणांतून एकूण सुमारे पाच हजार क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झालेला आहे.