शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:57 IST

जून महिन्यात दमदार पाऊस : कोयनेला २४ तासांत ८७ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने पश्चिम भागातील प्रमुख सहा प्रकल्पांत ८१ टीएमसीहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. बलकवडी वगळता इतर पाच धरणे ही ५१ ते ७३ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगरला ८७ मिलिमीटर झाला आहे.पावसाळ्याचा एक महिना संपला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला. तसेच छोटे पाणी प्रकल्पही ओसंडून वाहू लागले आहेत. तर पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि शेती पाण्याचीही चिंता मिटलेली आहे. त्यातच जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरूच आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे ६१ आणि महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणी आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ५३.६९ टीएमसी झाला होता. ५१.०१ टक्केवारी पाणीसाठ्याची झालेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील प्रमुख प्रकल्पातही मोठा पाणीसाठा आहे.धोम धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण सुमारे ६१ टक्के भरलेले आहे. तर बलकवडी धरणात ३२ टक्केच साठा आहे. सध्या १.२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजून कमी आहे. कण्हेर धरणातही ६.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६८ टक्क्यांवर भरलेले आहे. उरमोडी धरणातही ७३ टक्के साठा झाला असून ७.२५ टीएमसी धरण भरले आहे. पाटण तालुक्यातही पाऊस पडत आहे. यामुळे तारळी धरणात पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास तारळी धरणात ३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण जवळपास ६७ टक्के भरलेले आहे.

धरणांची १४८ टीएमसी क्षमता..जिल्ह्यात अनेक पाणी प्रकल्प आहेत. पण, कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा प्रकल्प प्रमुख आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीहून अधिक आहे. यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे सध्या या सहाही धरणांत ८१.२७ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे या धरणांत सध्या ५४ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. पावसाळ्याचे तीन महिने बाकी आहेत. यामुळे या प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होणार आहे.