बामणोली, तापोळा परिसरात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:55+5:302021-06-17T04:26:55+5:30
बामणोली : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील बामणोली आणि तापोळा परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ...

बामणोली, तापोळा परिसरात मुसळधार
बामणोली : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील बामणोली आणि तापोळा परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ओढे, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर परिसरातील छोटे-मोठे धबधबेही प्रवाहित होऊन कोसळत आहेत.
जावळी तालुक्यातील बामणोली परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर आहे. अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर परिसरातील तापोळा भागातही पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोयना जलाशयात पाणी येऊ लागलंय. त्याचबरोबर परिसरातील ओढे, ओहोळ भरुन वाहत आहेत. तर परिसरातील डोंगररांगातील छोटे-मोठे धबधबेही कोसळत आहेत. त्यातच परिसर हिरवा शालू नेसल्यामुळे सर्वत्र नयनरम्य नजारा दिसून येऊ लागला आहे. या पावसामुळे जनावरांनाही हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे.
फोटो दि.१६बामणोली पाऊस नावाने...
फोटो ओळ : जावळी तालुक्यातील बामणोली परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने परिसर हिरवागार झाला आहे. (छाया : लक्ष्मण गोरे)
...........................................................