शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 13:07 IST

Rain Satara : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान नोंद झाले. तर कोयना धरणात २४ तासांत सवा तीन टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणात ५७.३५ टीएमसी साठा झाला होता. सातारा शहरात तर बुधवारीही सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता.

ठळक मुद्देसाताऱ्यासह पश्चिम भागात पावसाचा जोर, कोयनेत तीन टीएमसी वाढ नवजा अन् महाबळेश्वरला दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान

सातारा : सातारा शहरासह पश्चिम भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. नवजा आणि महाबळेश्वरला सलग दुसऱ्या दिवशीही १०० मिलीमीटरवर पर्जन्यमान नोंद झाले. तर कोयना धरणात २४ तासांत सवा तीन टीएमसी पाण्याची वाढ झाली. धरणात ५७.३५ टीएमसी साठा झाला होता. सातारा शहरात तर बुधवारीही सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता.जिल्ह्यात दडी मारुन बसलेल्या पावसाला मागील १२ दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सुरुवातीच्या काही दिवसांत पश्चिम भागात रिमझिम स्वरुपात पाऊस पडत होता. त्यानंतर हळू हळू पाऊस जोर धरु लागला. यामुळे भात लागणीच्या कामाला वेग आला. तर गेल्या चार दिवसांपासून पावसाने आणखी जोर धरला आहे.

विशेष करुन पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे जोरदार वृष्टी होत आहे. तर साताऱ्यासह परिसरातही पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. पूर्व भागातही अधून मधून सरी पडत आहेत.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर १०९ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत १५१० मिलीमीटरची नोंद झाली आहे. नवजाला सकाळपर्यंत १४८ व यावर्षी आतापर्यंत २१२४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला १४० आणि जूनपासून आतापर्यंत २०८३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५७.३५ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात सवा तीन टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास ३२२०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान